
सोलापूर : घोंगडे वस्तीतील हाणामारीप्रकरणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे पुत्र बिपिन पाटीलसह आठ ते नऊजणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप पाटील, पवन तगादे, विनायक पाटील, नवीन गोटीमुकुल (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य संशयितांची नावे आहेत.