
सोलापूर : सध्या काळ बदलला आहे. पण, काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलेली नाही. सर्वधर्मसमभाव आपण कोठेही बिघडू दिलेला नाही. काँग्रेस पडते आणि पुन्हा उभे राहते. तत्त्वाशी कधीही तडजोड केलेली नाही. एक पराभव झाला म्हणून काय बिघडत नाही. आम्ही तीन-तीन पराभव पचवून बसलेलो आहोत. कोणी बोललं म्हणून काँग्रेस संपत नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.