भावी डॉक्टरांची ऑक्टोबरमध्ये ‘परीक्षा’! ऑफलाइन परीक्षेत २२५ कॉपीबहाद्दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

logo
भावी डॉक्टरांची ऑक्टोबरमध्ये ‘परीक्षा’! ऑफलाइन परीक्षेत २२५ कॉपीबहाद्दर

भावी डॉक्टरांची ऑक्टोबरमध्ये ‘परीक्षा’! ऑफलाइन परीक्षेत २२५ कॉपीबहाद्दर

सोलापूर : कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑफलाइन परीक्षा घेतली. ऑनलाइन परीक्षांमध्ये दोन वर्षांत एकही विद्यार्थी कॉपी करताना सापडला नाही. पण ऑफलाइन परीक्षेत २२५ कॉपीबहाद्दरांना पकडले गेले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत जवळपास ८४ अभ्यासक्रम शिकवले जातात. कौशल्य विकासाचे जवळपास सव्वाशे प्रमाणपत्र कोर्सेस आहेत. पण, ८४ अभ्यासक्रमासाठी विद्यापीठातील कॅम्पस्‌ व संलग्नित ११० महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या ८० हजार विद्यार्थ्यांनी जवळपास सातशे पेपर दिले. १४ जुलै ते २ सप्टेंबर या काळात विद्यापीठाची सत्र परीक्षा पार पडली. ही परीक्षा ऑनलाइन घ्यावी, वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी सातत्याने विद्यापीठाकडे केल्या. त्यानंतर विद्यापीठाला दोनदा परीक्षेचे नियोजन बदलावे लागले होते. तरीपण, अल्पावधीतच विद्यापीठाने परीक्षेनंतर काही दिवसांत बीएड, एलएलम, अभियांत्रिकीचे निकाल जाहीर केले. आता बीए, बी-कॉम, एमए, एमएससी, एम-कॉम या अभ्यासक्रमांचे निकाल आठ दिवसांत जाहीर होतील, अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली. आणखी जवळपास ६५ ते ७० सेमिस्टरचे निकाल राहिलेले आहेत. पण, परीक्षा सुरु झाल्यापासून दोन महिन्यांत सर्वच निकाल जाहीर करण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आघाडीवर असल्याचेही अधिकारी सांगतात. पुढील सत्र परीक्षा डिसेंबर २०२२ मध्ये होईल. आगामी परीक्षा वर्णनात्मक प्रश्नांवर आधारित आणि ऑफलाइनच असेल, असेही सांगण्यात आले.

परीक्षांचा निकाल काही दिवसांत

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ऑफलाइन परीक्षांचा निकाल काही दिवसांत जाहीर केले आहेत. आता काही अभ्यासक्रमांचे निकाल राहिले असून आठ दिवसांत तेही जाहीर होतील.
- डॉ. शिवकुमार गणापूर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ

ऑक्टोबरमध्ये भावी डॉक्टरांची ‘परीक्षा’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत पी-एचडी करणाऱ्या भावी डॉक्टरांची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच पुढील महिन्यांत ’कोर्स वर्क’ परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निकषांनुसार ही परीक्षा देणे प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. तसेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्या भावी डॉक्टरास काहीच कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

Web Title: Examination Of Future Doctors In October 225 Copybahadar In Offline

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..