'राज्य उत्पादन'ची माेठी कारवाई! 'सव्वा कोटीची हातभट्टी, विदेशी दारू जप्त'; आषाढीच्या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरही लक्ष
Illegal Liquor, Foreign Alcohol Seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर कार्यालयाच्या पथकांनी १ जुलै रोजी कारवाई करीत नऊ हजार ५५० लिटर गुळमिश्रित रसायन, २३५ लिटर हातभट्टी, १९४ लिटर देशी दारू, ३० लिटर विदेशी दारू व ७८ लिटर बिअर आणि एक चारचाकी वाहन, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
₹1.25 Crore Worth Liquor Seized in One Month by Excise DepartmentSakal
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती अड्ड्यांवर, अवैध ढाब्यांवर धडक कारवाई करीत १४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.