
रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर : 'या' चार रेल्वे गाड्यांना मिळणार एक्स्प्रेसचा दर्जा
सोलापूर - खासगी तसेच एसटी महामंडळाच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर खूपच कमी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यासह शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी पॅसेंजरने प्रवास करतात. मात्र, सोलापूर विभागातून धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्यांना (Express status for four passenger trains) एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आल्याने प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे. पण, थांबे पूवर्वत ठेलण्याची मागणी होत आहे.
सोलापूरहून शहरातील आणि ग्रामीण भागातील बहुतांश प्रवासी पुण्याकडे शिक्षण, नोकरीसाठी जात असतात. अनेक प्रवाशांना एक्स्प्रेसचे तिकीट परवडत नसल्याने ते पॅसेंजरने प्रवास करीत असतात. रात्री पुण्याला जाऊन दिवसभर काम करुन पुन्हा रात्री पॅसेंजरने प्रवास करतात. मात्र, सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर डेमूचा फायदा होत नाही. सोलापूर-वाडी, वाडी-सोलापूर या गाड्या सर्व स्थानकावर थांबत होत्या. मात्र, आता एक्स्प्रेसचा दर्जा दिल्याने कमी उत्पन्नाच्या स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एकीकडे गाड्या एक्स्प्रेस झाल्या खऱ्या मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असल्याने प्रवाशांनी पूर्वीचे थांबे ठेवावेत, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
या पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेचा दर्जा
सोलापूर पुणे डेमू
पुणे-सोलापूर डेमू
सोलापूर-वाडी
वाडी-सोलापूर