
सोलापूर : सोलापूर महापालिका आणि जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी प्रभाग रचनेसाठी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात अंतिम प्रभागरचना प्रसिद्धीसाठी २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर अशी मुदत होती. आता २३ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार अंतिम प्रभाग रचनेसाठी २६ ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. महापालिका व नगरपरिषदेची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी जवळपास एक महिन्यांचा वाढीव कालावधी मिळाला आहे.