पोर्टल व उताऱ्यावरील तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना हवी पीक विमा योजनेची मुदत वाढ 

crop insurance.jpg
crop insurance.jpg
Updated on

पांडे(सोलापूर)ः पिक विमा भरण्याची अंतीम मुदत 31जुलै रोजी संपली पंरतु आहे करमाळा शहरात कोरोना मुळे अचानक करावा लागलेला जनता कर्फ्यु, ग्रामीण भागात रेंज नसल्याने संथ गतीने चालणारे पोर्टल व उताऱ्यावरील असनाऱ्या चुका या मुळे करमाळा तालुक्‍यातील हजारो शेतकरी पिक विमा भरण्या पासुन वंचीत राहिले आहेत. 

अगोदर फक्त पिकांच्या व शेतकऱ्यांच्या नावाच्या आधारे नोंदी होत होत्या मात्र पिक विमा भरताना गैरप्रकार टाळावा या साठी शासनाने यंदा विमा कंपनीचा पोर्टल शासनाच्या महाभुमिलेख पोर्टलला जोडला आहे. त्या मुळे सात बारा उताऱ्यावरील क्रमांक, गट क्रमांक, आठ अ या वरील नोंदीची खातरजमा केल्यावरच फॉर्म पुढे अपलोड होत आहे, त्यातच तलाठी देखील कोरोणाच्या कामात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या . 

पोर्टल डावुन झाल्याने दिवसभरात दहा ते पंधरा अर्ज भरले गेले त्या मुळे दिवस ,दिवस रांगेत उभा राहुन देखील करमाळा तालुक्‍यातील अनेक शेतकरी पिक विमा योजने पासुुन वंचीत राहिले आहेत .तरी सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानभुतीपुर्वक विचार करुन पिक विमा भरण्याची मुदत वाढवुन देणे गरजेचे झाले आहे. 

मुदत वाढीला पर्याय नाही 
शेतकऱ्यांना रांगा लावून पीक विमा हफ्ता भरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा हफ्ता भरण्याची संधी मिळाली पाहीजे. 
शाहुराव फरतडे, शिवसेना माजी तालुका प्रमुख.

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com