

Ashadhi Wari 2026: Warkaris Stay Firm on Alandi Route Despite Heavy Rain Warning
sakal
-विलास काटे
आळंदी : पुढील दोन दिवस राज्यात रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेच्या कारणास्तव वारकऱ्यांना आळंदीत न येता थेट पुणे शहरात येण्याचे आवाहन केले होते. पण राज्यभरातील तमाम वारकरी मात्र आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. जवळपास दोन लाखांहून अधिक भाविक आळंदीत विविध धर्मशाळांमध्ये मुक्कामी आहेत. त्यामध्ये मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी आषाढी वारीसाठी हजेरी लावल्याचे चित्र आहे.