

Fake Caste Certificate Used to Contest Election Vigilance Inquiry Reveals Irregularities in Caste Claim and Election Process
sakal
सोलापूर : सत्ताधारी पक्षाच्या आडोशाला काहीजण बनावट जातीचा दाखला काढून निवडणूक लढवतात, जिंकूनही येतात. मात्र, जातीबद्दल संशय घेऊन त्यांच्या विरोधकांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर दक्षता पथकाद्वारे सखोल तपासणी झाल्यावर सुनावणीअंती समितीने ते दाखले अवैध ठरवले. मात्र, समितीने दाखला रद्द करूनही सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कार्यकाळ पूर्ण केला. दुसरीकडे, फेब्रुवारीत झालेल्या पंचायत समितींची निवडणुकीत विजयी दोन सदस्यांचेही दाखले समितीने रद्द केले आहेत. महापालिकेच्या एका नगरसेविकेचाही दाखला अवैध ठरवला. तरीदेखील, त्या अजून पदावर कायम आहेत.