
माळशिरस : तालुक्यातील गोरडवाडी येथे आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या पथकाने छापा टाकून बोगस डॉक्टरवर कारवाई केली. तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक वाघमोडे (रा. तिरवंडी) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.