
सोलापूर : शैक्षणिक पात्रता नसताना आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक प्रमाणपत्र नसताना देखील बिनधास्तपणे रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन बनावट डॉक्टरांवर फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सी. के. मंडल, पत्नी निलिमा मंडल, देवाशीश दिलीपकुमार शर्मा (सर्वजण रा. उमा नगरी, पुना नाका, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टनुसार या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने संशयितांना अटक झालेली नाही.