
सोलापूर : पैशांची गरज असतानाही राजाराम ग्यानबा गाजरे (वय ५०, रा. शेळवे, ता. पंढरपूर) यांचा जमीन विकायला विरोध होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी विकणाऱ्याचा भावजी पांडुरंग नामदेव मिसाळ (वय ३०) याच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून त्याला खरेदीदस्त व हक्कसोड दस्त करताना दुय्यम निबंधकांसमोर उभे केले. हा प्रकार पडताळणीवेळी समोर आला आणि सहायक दुय्यम निबंधक उमाकांत लिमसडे यांनी पंढरपूर शहर पोलिसांत दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.