

Shalarth ID Scam Probe Maharashtra Reviews Four Lakh Teacher Records and Flags Errors in 17000 Cases Notices Expected Soon
sakal
सोलापूर : बनावट शालार्थ आयडी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन पगार घेणाऱ्यांना शोधण्यासाठी शालेश शिक्षण विभागाने राज्यातील चार लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन मागविली. पडताळणीवेळी १६ ते १७ हजार जणांच्या माहितीत ‘एरर’ दाखवत असल्याची बाब समोर आली आहे. या सर्वांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना ती मूळ कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.