

Shocking Murder in Mohol: Woman and Two Sons Accused in Uncle’s Killing
esakal
-राजकुमार शहा
मोहोळ: कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे शेतीच्या वादातून झालेल्या जुन्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. मयताची भावजय सुरेखा शिंदे यांनी डोळ्यात चटणी पुड टाकून मयतास खाली पाडले व दोघा पुतण्यानी आपल्या चुलत्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना कामती खुर्द ता. मोहोळ येथे सोमवार ता. 23 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.