मंगळवेढा - जमिनीची नोंद धरणावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला वैतागून नंदेश्वरच्या शेतकऱ्यांनी तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव व्हाट्सअप स्टेटसला ठेवत मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर तेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.