
उ. सोलापूर : पाडव्यानिमित्त तलावात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील तिऱ्हे येथे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बैलजोडीपैकी एका बैलाचाही मृत्यू झाला. अंकुश काशिनाथ सिरसट (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.