“Grief in Musti village as a farmer ends life following heavy crop loss.”
“Grief in Musti village as a farmer ends life following heavy crop loss.”Sakal

Solapur News: 'पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने जीवन संपवले'; मुस्ती येथील घटनेमुळे सर्वत्र हळहळ

Tragedy in Musti: डबा देण्यासाठी सोमवारी सकाळी ९.२० च्या सुमारास त्यांचा मुलगा लक्ष्मण हे शेतात गेले. तेव्हा ते पत्र्याच्या शेडमध्ये गेले असता वडिलांनी वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी नातेवाइकांसह सोलापूर तालुका पोलिसांना कळवले.
Published on

सोलापूर : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने मुस्ती (ता. द. सोलापूर) येथील शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सोमवारी (ता. १) सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चंद्रकांत गुरुपादप्पा माळगे (वय ८०) असे त्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com