
सोलापूर : अतिवृष्टीमुळे वाया गेलेली पिके, बँकेच्या कर्जाचे वाढलेले ओझे याला कंटाळून मुस्ती (ता. द. सोलापूर) येथील चंद्रकांत माळगे (वय ८०) या शेतकऱ्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळले. निसर्गाच्या अवकृपेमुळे वडिलांनी लक्ष्मीदिवशीच संपवलेल्या जीवनयात्रेमुळे मुलगा लक्ष्मणसह माळगे कुटुंबीय पोरके झाले.