'एसटी'च्या विलिनीकरणासाठी शेतकऱ्याचे सोलापूर ते तुळजापूर दंडवत! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'एसटी'च्या विलिनीकरणासाठी शेतकऱ्याचे सोलापूर ते तुळजापूर दंडवत!
'एसटी'च्या विलिनीकरणासाठी शेतकऱ्याचे सोलापूर ते तुळजापूर दंडवत!

'एसटी'च्या विलिनीकरणासाठी शेतकऱ्याचे सोलापूर ते तुळजापूर दंडवत!

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Transport Corporation) राज्य शासनात विलीन करा, या प्रमुख मागणीसाठी चालक, वाहक व यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी 4 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन (ST Strike) पुकारले आहे. मागील 19 दिवसांपासून राज्यातील एसटीच्या 31 विभागातील आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी शिरापूर (सो.) (ता. मोहोळ) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील (Anil Patil) यांनी रूपाभवनी (Rupabhavani) ते तुळजापूर (Tuljapur) असा दंडवत घालून शासनाचा निषेध केला.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

महामंडळातील चालक, वाहक व यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी 4 नोव्हेंबरपासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा लढा सुरू केला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पहिल्या एक-दोन दिवसांमध्ये काही कर्मचारी संपात सहभागी झाले होते. मात्र, 4 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. शासनाचे एसटी कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर एसटी डेपोसमोर जागरण गोंधळ आंदोलन देखील करण्यात आले.

दरम्यान, आज (सोमवारी) सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर (सो.) येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी सोलापूर येथील रुपाभवानीचे दर्शन घेऊन दंडवत आंदोलनास प्रारंभ केला. पाटील हे सोलापूर ते तुळजापूर असे दंडवत घालणार आहेत. या वेळी एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, ही मागणी पुढे करत कर्मचाऱ्यांनी विविध गीत गात, घोषणा दिल्या.

गुरुवारी (18 नोव्हेंबर) एसटी कर्मचाऱ्यांनी शासनास जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ घातले. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना विविध गाण्यांवर साथ देत भजन आणि विविध प्रकारची गाणे गात शासनाचे लक्ष वेधले. तर सोमवारी (ता. 22) नोव्हेंबर रोजी अनिल पाटील यांनी रुपाभवानी ते तुळजापूर असा तब्बल 50 किलोमीटर दंडवत घालत शासनाचे लक्ष वेधले.

हेही वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नवस केला होता व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर रुपाभवानी ते तुळजापूरपर्यंत 171 दंडवत घातला. मात्र राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापही दखल घेतली नाही. म्हणून सोलापुरातील रूपाभवानी ते तुळजापूरपर्यंत दंडवत घालत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना आई तुळजाभवानीने सबुद्धी द्यावी, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे आई तुळजाभवानीला साकडे घातले आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर आमच्या शेतकऱ्यांना व एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती.

- अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ता, शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर

loading image
go to top