मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! 141 देशांमध्ये आहे 'या' क्रमांकावर | Sci-Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर
मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! 141 देशांमध्ये आहे 'या' क्रमांकावर

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारताची सुधारणा! जगात आहे 'या' क्रमांकावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोबाईल इंटरनेट स्पीड टेस्टमध्ये (Mobile Internet Speed Test) भारताच्या (India) क्रमवारीत सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2021 च्या तुलनेत ऑक्‍टोबर 2021 मध्ये भारताच्या क्रमवारीत 5 स्थानांची सुधारणा झाली आहे. अशा प्रकारे, भारत 141 देशांपैकी 117 व्या क्रमांकावर आहे. ऑक्‍टोबर महिन्यात भारताचा सरासरी डाउनलोडिंग इंटरनेट स्पीड 13.45 एमबीपीएस आहे. या कालावधीत सरासरी अपलोडिंग गती 3.36 Mbps आहे. नेपाळ (Nepal) आणि पाकिस्तान (Pakistan) हे शेजारी देश असले तरी मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारतापेक्षा खूप पुढे आहेत. मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये नेपाळने तीन स्थान गमावले. असे असतानाही नेपाळने 107 वा क्रमांक पटकावला आहे. तर पाकिस्तान 7 स्थानांनी प्रगती करत 110 व्या स्थानावर पोचला आहे, तर श्रीलंका (Shrilanka) 120व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) 139व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

ब्रॉडबॅंड स्पीड टेस्ट

जागतिक स्तरावर ब्रॉडबॅंड स्पीड चाचणीत भारत ऑक्‍टोबर महिन्यात 2 स्थानांच्या घसरणीसह 70 व्या क्रमांकावर आहे. या कालावधीत सरासरी डाउनलोडिंग स्पीड 46.18 mbps आहे. तर या कालावधीत भारताचा अपलोडिंगचा सरासरी वेग 44.11 एमबीपीएस आहे.

जागतिक गती

जागतिक स्तरावर इंटरनेट स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ऑक्‍टोबर महिन्यात सरासरी मोबाईल डाउनलोडिंग स्पीड 28.61 एमबीपीएस आणि अपलोडिंग स्पीड 8.38 एमबीपीएस आहे. ब्रॉडबॅंड स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास ऑक्‍टोबर महिन्यात ब्रॉडबॅंडचा सरासरी स्पीड 56.09 एमबीपीएस होता, तर अपलोडिंग स्पीड 23.56 mbps आहे.

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये अव्वल आहेत 'हे' देश...

  • UAE - 130.19 mbps

  • नॉर्वे - 107.50 mbps

  • दक्षिण कोरिया - 98.93 mbps

  • कतार - 92. 83 mbps

  • नेदरलॅंड्‌स - 91.55 mbps

हेही वाचा: नामशेष झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल!

जगातील सर्वात वेगवान ब्रॉडबॅंड इंटरनेट स्पीड असलेले देश...

  • सिंगापूर - 188.11 mbps

  • थायलंड - 173.44 mbps

  • हॉंगकॉंग - 170.48 mbps

  • चिली - 163.49 mbps

  • डेन्मार्क - 146.64 mbps

loading image
go to top