

Maharashtra Farmer Allegedly Faces Harassment After Paying 17 Lakh on 20 Lakh Loan and Still Being Asked for 12 Lakh
sakal
पंढरपूर: खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीचा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी बालाजी बागल यांना राहत्या घरातून बाहेर काढून घराला कुलूप ठोकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बागल यांचे कुटुंब बेघर झाले असून, फायनान्स कंपनीच्या वसुली पद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.