esakal | उजनी परिसरात केळीचे मोठे उत्पादन! संशोधन उपकेंद्राची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी परिसरात केळीचे मोठे उत्पादन! संशोधन उपकेंद्राची गरज

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या उजनी धरण क्षेत्रातील हवामान केळी पिकासाठी पोषक आहे.

उजनी परिसरात केळीचे मोठे उत्पादन! संशोधन उपकेंद्राची गरज

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

केत्तूर सोलापूर) : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या उजनी धरण (Ujani Dam) क्षेत्रातील हवामान केळी (Banana) पिकासाठी पोषक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीचे पीक घेतले जाते. त्यामुळे या परिसरात केळी संशोधन उपकेंद्र (Banana Research Subcentre) उभारण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. करमाळा (Karmala), माढा (Madha), माळशिरस (Malshiras), पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) या परिसरात 25 हजार एकर क्षेत्रावर केळी पीक घेतले जाते. प्रामुख्याने करमाळा तालुक्‍यात सर्वात जास्त क्षेत्र आहे.

हेही वाचा: गडकरींच्या हस्ते 2016 मध्ये भूमिपूजन झालेले दोन उड्डाणपूल नकाशावरच!

जास्त दिवस टिकण्याची क्षमता व विशिष्ट प्रकारची चव असल्याने उत्तर भारतासह आखाती देशात मोठ्या प्रमाणात करमाळा तालुक्‍यातील केळीला मागणी आहे. तसेच किसान रेल्वेमुळेही येथील केळी देशातील विविध कानाकोपऱ्यात पोचत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता, उजनी लाभक्षेत्र परिसरातील शेती क्षेत्राला व्यावसायिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी, नवीन रोग नियंत्रण, औषध निर्माण, एकरी उत्पादन वाढ, त्यासाठी केळी संशोधन व विकास केंद्राची उपशाखा उभारण्याची मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे केळी निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल. या सर्व बाबींचा शासनाने सकारात्मक विचार करून केळी संशोधन उपकेंद्र उभारावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा: अक्कलकोट तालुक्‍यातील उत्तर भागात दमदार तर दक्षिणमध्ये तुरळक पाऊस

उजनी पाणलोट क्षेत्रात केळी लागवडी खालील क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या परिसरात शासनाने राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे. शेतकऱ्यांना माती, पाणी, रासायनिक खते यांचे परीक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा चालू करण्यात यावी व मालाची साठवणूक करण्यासाठी शीतगृहासाठी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात यावा.

- सुयोग झोळ, केळी उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा

loading image
go to top