"शेतकऱ्यांना, थकीत बिल भरा अन्यथा 22 नोव्हेंबरपासून वीजपुरवठा खंडित" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electricity bills

अन्यथा 22 नोहेंबर पासून सर्व रोहित्राचा विद्युत पुरवठा (डीपी) बंद करण्यात येणार आहे.

"शेतकऱ्यांना, थकीत बिल भरा अन्यथा 22 नोव्हेंबरपासून वीजपुरवठा खंडित"

पोथरे (सोलापूर) : महावितरण कडील थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपले थकीत विजबिल भरुन सहकार्य करावे. अन्यथा 22 नोहेंबर पासून सर्व रोहित्राचा विद्युत पुरवठा (डीपी) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे रोहित्रा वरील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक कनेक्शन धारकांनी वीज बिल भरून होणारी कारवाई थांबवावी, असे आवाहन कार्तिक वाघमारे कनिष्ठ अभियंता करमाळा ग्रामीण यांनी केले आहे.

हेही वाचा: मायलेकीच्या खुनाने हादरला करमाळा तालुका! संशयित आरोपी पती फरार

पोथरे (तालुका करमाळा) येथे वीज बिल वितरण व वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना श्री वाघमारे म्हणाले की, सध्या महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना याबाबत सूचना केल्या जात आहे. करमाळा तालुक्यात सध्या करमाळा, मांगी, पोटेगाव, पांडे, झरे, जातेगाव, जिंती, कोर्टी, आदी 13 उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्रावर दोनशे कोटी हून अधिक शेती पंपाची थकबाकी असल्याने महावितरणे थकीत विजबिल वसुली मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा: मांगी तलावात पाणी नसतानाच करमाळा MIDCला केले आरक्षित

या अनुषंगाने 22 नोव्हेंबर पर्यंत पाच एचपी कनेक्शन धारकांनी पाच हजार रुपये व सात एचपी कनेक्शन धारकांनी साडेसात हजार रुपये चालू बाकी भरून आपला रोहित्र सुरु ठेवावा. ज्या रोहित्रा वरील शेतकरी एकत्र येऊन विज बिल भरतील, त्या रोहित्रा चा वीज पुरवठा सुरळीत ठेवला जाणार असून जे शेतकरी बाकी भरणार नाहीत. त्या रोहित्राचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे व आपला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.

loading image
go to top