
-राजकुमार शहा
मोहोळ : शिक्षणाचे महत्त्व पूर्वी फक्त शहरी भागातच होते, मात्र आता ग्रामीण भागातील सर्वसाधारण नागरिकांनाही शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. यात तरुणीही मागे नाहीत. औंढी (ता. मोहोळ) येथील केवळ दीड एकर शेती असणाऱ्या सुभाष सोलंकर या शेतकऱ्यांची मुलगी विद्या सोलंकर हिने गावातील पहिली महिला वकील होण्याचा मान मिळविला, ग्रामस्थांतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.