

Shaktipeeth Project Faces Statewide Farmers’ Resistance
Sakal
वैराग : शक्तिपीठ महामार्गास समांतर रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना राज्यातील जनतेवर १ लाख कोटींच्या कर्जाचा बोजा टाकून नये. आवश्यकताच असेल तर याच महामार्गाचे रुंदीकरण करा, पण शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे. कंत्राटदार जगविण्यासाठी बागायती जमीन, पर्यावरण, गौणखनिज, वन्यजीवांचे नुकसान करून महापुरासारख्या संकटामध्ये राज्यातील जनतेला लोटले जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.