
सोलापूर : यंदा पूर्वमोसमी पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यात गुरुवार (ता. १२)पर्यंत १७ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, सततच्या पावसाने शेतकरी वैतागले आहेत. कारण मशागतीची कामेही करता येईना अन् पेरताही येईना, अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यातच हवामान विभागाने सोमवार (ता. १६)पासून सलग तीन दिवस ''ऑरेंज ॲलर्ट'' जाहीर केला आहे. त्यामुळे तूर्तास वाफसा मिळून पेरणीला वेग येण्याची चिन्हे दिसत नाही. परिणामी शेतात गवत वाढण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.