
Mangalwedha Farmers
Sakal
मंगळवेढा : राज्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्याला मदत देण्यासाठी सरकारने साखर कारखानदाराकडून प्रति टन 15 रुपये घेण्याचा आदेश दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदाराकडून कशाला घेता आमच्याकडून घ्या म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये फोन पे द्वारे पाठवून सरकारच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला.