

Damaged watermelon and muskmelon crops after unseasonal rains; prices may rise soon.
sakal
सोलापूर: आखाती देशांतील युद्धामुळे मागणीत झालेली घट आणि अवकाळी पावसाचा कलिंगड, खरबुजाला फटका बसला आहे. आवक वाढली असतानाही बदललेल्या वातावरणामुळे मागणी कमी झाल्याने दरांमध्ये घसरण झाली आहे. कलिंगडाच्या दरामध्ये जवळपास निम्म्याने म्हणजे किलोमागे सात रुपये तर खरबुजाचे दर सहा रुपयांनी कमी झाले आहेत. कमी झालेल्या दरांमुळे उत्पादन-वाहतूक खर्चही निघणे अवघड झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.