सोलापूर जिल्ह्यातील 'या' दोन गावातील शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज

जिल्ह्यातील महावितरणची थकबाकी कमी करून ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याची सवय पडळकर यांनी लावली.

सोलापूर जिल्ह्यातील 'या' दोन गावातील शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

सोलापूर: महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीतून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास हातभार लागला. त्यांनी सौर कृषी वाहिनीतून हन्नूर (ता. अक्‍कलकोट) व मानेगाव (ता. माढा) या दोन गावातील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरु करून दिली.

हेही वाचा: अक्‍कलकोट कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर! करमाळा, माढ्यातील रुग्ण घटले

जिल्ह्यातील महावितरणची थकबाकी कमी करून ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याची सवय पडळकर यांनी लावली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत घरगुती, व्यापारी, व्यावसायिक वीजबिलांची थकबाकी कमीच होती. शेती थकबाकीची परिस्थिती राज्यभर सारखीच आहे. दरम्यान, पडळकर यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचाही अनेकदा प्रयत्न केला. तसेच सौर कृषीवाहिनी, सौर कृषी पंप, उच्चदाब वितरण प्रणालीतून (एसव्हीडीएस) 11 हजार शेतकऱ्यांना सिंगल फेजचे कनेक्‍शन दिले. त्यांच्या कार्यकाळात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हन्नूर (ता. अक्‍कलकोट) व मानेगाव (ता. माढा) या गावांमधील अंदाजित दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांना सौर कृषीवाहिनीतून वीज पुरवठा केला. आता महावितरणची थकबाकी वसुलीची मोहीम जोमात असल्याने सोलापूरात महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हणून रुजू होणाऱ्या सांगळे यांच्यासमोर ते प्रमुख आव्हान असणार आहे. शुक्रवारी (ता. 20) ते पदभार स्वीकारणार आहेत.

हेही वाचा: तुम्हाला लगेच नोकरी हवीय का? सोलापूर विद्यापीठात 114 कोर्सेस

दोन्ही गावांना "असा' होतो वीजपुरवठा

शासनाच्या सौर कृषीवाहिनीतून अक्‍कलकोट तालुक्‍यातील हन्नूर व माढा तालुक्‍यातील मानेगावातील शेतकऱ्यांना महावितरणच्या सबस्टेशनच्या पाच किलोमीटर परिसरात सौर पॅनल उभारण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 10 एमडब्ल्यू वीज तयार होण्याची क्षमता आहे. सूर्यप्रकाशातून तयार होणारी वीज साठवून सबस्टेशनकडे वळविली जाते. तिथून त्या परिसरातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जातो, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली. जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप जोडून दिला असून वीज नसतानाही ते पीकांना पाणी देऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Farmers In Hannoor And Manegaon In Solapur District Were Provided Electricity Through Solar Agriculture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurElectricity
go to top