esakal | उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! अवघ्या 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंबाचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! अवघ्या 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंबाचे उत्पन्न

माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथील शेतकरी भारत अंकुश जाधव. या शेतकऱ्याने अवघ्या 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंबाचे उत्पादन काढले असून, 14 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न घेतले आहे.

उपळाईच्या शेतकऱ्याने नादच केलाय थेट! 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंब

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : पारंपरिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून (Modern technology) शेती (Agriculture) केली आणि मार्केटिंगचे (Marketing) तंत्र शिकून घेतल्यास शेतकऱ्यांना शेतीमधून मोठा नफा मिळू शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथील शेतकरी भारत अंकुश जाधव. या शेतकऱ्याने अवघ्या 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंबाचे (pomegranate) उत्पादन काढले असून, 14 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न घेतले आहे.

हेही वाचा: 'डीसीसी'त भीती 'मी पुन्हा येईन'ची!

भारत अंकुश जाधव हे प्रयोगशील डाळिंब बागायतदार आहेत. ते गेल्या 20 वर्षांपासून डाळिंबाचे उत्पन्न घेतात. दरवर्षी वेगवेगळे प्रयोग करून, योग्यवेळी बागेची छाटणी, फवारणी याचे चोख व्यवस्थापन, रोगराईपासून बागेचे संरक्षण, उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण ही सर्व मॅनेजमेंटपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतची कामे स्वतः करतात. त्यांची गावाशेजारी 30 गुंठे जमीन असून त्यापैकी त्यांनी 25 गुंठ्यांत डाळिंबाची 216 रोपे लावली होती. यासाठी त्यांना जवळपास दोन लाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. उपळाई या भागात पाण्याची सतत टंचाई असते. परंतु भारत जाधव हे लहान मुलांप्रमाणे ही झाडे सांभाळत असून, बागेत पाण्याची टंचाई भासू देत नाहीत. त्यामुळे त्यांची बाग चांगलीच बहरली आहे.

हेही वाचा: शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय फड मात्र जोमात !

सध्या त्यांच्या बागेतील डाळिंबाला प्रतिकिलो 88 रुपये इतका भाव मिळाला असून, केरळमधील व्यापाऱ्यांनी या डाळिंबाची खरेदी केली आहे. जवळपास 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भारत जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 25 गुंठ्यांत 16 टन डाळिंबाचे उत्पन्न घेतल्याने, शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तेलंगवाडी येथील डाळिंब बागायतदार कल्याण पांडुरंग शिंदे हे माझे गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागेचे व्यवस्थापन केले. गेल्या काही वर्षांचा अनुभव खूप कामी आला. त्यामुळे कमी गुंठ्यांत अधिक उत्पन्न घेता आले.

- भारत जाधव, डाळिंब बागायतदार, उपळाई बुद्रूक

loading image
go to top