शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय फड मात्र जोमात !

शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय फड मात्र जोमात !
शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय मात्र फड जोमात !
शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय मात्र फड जोमात !Canva
Summary

जिल्ह्यातील शिवारामध्ये टोमॅटोचा अक्षरश: लाल चिखल निर्माण झाला आहे. दुसरीकडे मंदिरे उघडणे, जिल्हा बॅंक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकारणाचा मात्र फड जोमात आहे.

सोलापूर : गेल्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी (Heavy Rains), महापूर (Flood), कोविड (Covid-19) टाळेबंदी (Lockdown) अशी एकामागून एक संकटे येत असल्याने बळिराजा (Farmers) हतबल झाला आहे. अतिवृष्टी, महापूर यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज, अनुदान अशा अनेक घोषणा शासनाने केल्या; मात्र या अनुदानाची रक्कम अद्यापपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोचलीच नाही. त्यातच आता शेतीमालाच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. टोमॅटो, मिरची, पालेभाज्या या पिकांची तर प्रचंड वाताहात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट जागेवर सोडून दिले आहेत. बाजारात विक्रीसाठी नेलेला माल कवडीमोल दराने अथवा मार्केट यार्डात, रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिवारामध्ये टोमॅटोचा अक्षरश: लाल चिखल निर्माण झाला आहे. दुसरीकडे मंदिरे उघडणे, जिल्हा बॅंक (District Bank), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकारणाचा फड मात्र जोमात आहे.

शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय मात्र फड जोमात !
शिवसेनेसमोर आव्हान 'कोठे पर्व' रोखण्याचे!

राज्याच्या राजकारणात कधी नव्हे इतके द्वेषाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. विकासकामे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज प्रचंड टोकाचे राजकारण होताना दिसत आहे. बरं, हे राजकारण पॉझिटिव्ह, शेतकऱ्यांच्या हिताचे असते तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीही कारण नव्हते. त्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन होऊन ते मार्गी लागले असते. मात्र यामध्ये सरकार, विरोधक आणि सर्वच राजकीय पक्षांचा हेतू संशयास्पद असल्याचा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

आज शेतीमालाचे दर प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो, ढोबळी मिरची, पालेभाज्यांच्या दरांमध्ये तर प्रचंड घसरण झाली असून छोटा शेतकरी कोलमडून पडला आहे. मात्र, याच वेळी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतलेला शेतीमाल व्यापारी मात्र चढ्या दराने विकून स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. याविरुद्ध उठणारा आवाज मात्र क्षीण झाला आहे. शेतीमालाला चांगला दर मिळला पाहिजे, या विषयावर सातत्याने बोलले जाते. मात्र, आता हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि सरकारमधील पक्ष हे सर्वजण आज एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात मश्‍गूल आहेत. सत्ता, अधिकार आणि खुर्ची हे अंतिम ध्येय राजकीय नेते आणि पक्षांना आता उरले असल्याचे चित्र आहे. ही गोष्ट जनतेसाठी आणि लोककल्याणकारी राज्यासाठी चिंतेत टाकणारी बाब आहे.

शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय मात्र फड जोमात !
नवस फेडायला सायब राजकीय पक्ष कार्यालयात !

आंदोलनांमध्येही राजकारण

राज्यात सत्तेत असलेले पक्ष केंद्र सरकारच्या अधिकारातील मुद्द्यांवर तर राज्यात विरोधात असलेले पक्ष राज्य सरकार अधिकारातील निर्णयांविरुद्ध आंदोलन करत आहेत. याचे उदाहरण म्हणून इंधन दरवाढ, मंदिरे उघडणे या आंदोलनांकडे पाहता येईल. यावरून सर्वच राजकीय पक्षांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. शेतकऱ्यांचे यांना काहीही देणे-घेणे नसल्याची भावना निर्माण झाली आहे.

शेतकरी संघटना कुठे आहेत?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा सोलापूर जिल्ह्याशी यापूर्वी थेट संबंध राहिलेला आहे. खोत यांनी तर माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामध्ये सदाभाऊ यांचा पराभव झाला असला तरी कुठलीही पक्षीय ताकद नसताना त्यांच्यावर माढ्यातील लोकांनी भरभरून प्रेम केले. मात्र, त्या बदल्यात भाजप सोबतच्या पाच वर्षांच्या सत्ता काळामध्ये सदाभाऊंनी जिल्ह्यासाठी काय दिले, असा प्रश्न केला तर काहीही नाही, असेच उत्तर मिळेल. हल्ली तर सदाभाऊ केवळ निवडणूक प्रचारासाठीच जिल्ह्यात येतात, असा अनुभव आहे. राजू शेट्टी यांच्याबाबतही यापेक्षा वेगळा अनुभव नाही. पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर शेट्टी यांनी सोलापूरकडे दुर्लक्ष केले आहे.

शिवारात लाल चिखल, तरीही राजकीय मात्र फड जोमात !
'डीसीसी'त भीती 'मी पुन्हा येईन'ची!

स्थानिक संघटना मात्र ऍक्‍टिव्ह

गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील प्रभाकर देशमुख यांची जनहित शेतकरी संघटना, अतुल खुपसे यांची लोकशक्ती शेतकरी संघटना या संघटना ऍक्‍टिव्ह राहिल्या आहेत. उजनी पाणीप्रश्न, वीज तोडणी, शेतीमालाचे दर, कारखानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक यावर या संघटनांनी सातत्याने आवाज उठवला आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना न्यायही मिळाला आहे.

देशाचे, राज्याचे नेतृत्व करणारा जिल्हा पोरका

एकेकाळी देशाचे आणि राज्याचे नेतृत्व सोलापूर जिल्ह्याने केले. मात्र आज हा जिल्हा सक्षम नेतृत्वाविना पोरका झाला आहे. ज्याच्या शब्दाला राज्यात आणि केंद्रात वजन आहे, असा एकही नेता आजघडीला जिल्ह्यात नाही, हे येथील जनतेचे दुर्दैवच आहे. देशाचे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या या जिल्ह्याला आज स्थानिक पालकमंत्रीही मिळू नये, हे जिल्ह्याच्या भविष्यासाठी काही चांगले नाही. विद्यमान आमदार, खासदारांनी, आम्हीच जिल्ह्याचे नेते आहोत, अशा फुशारक्‍या मारणाऱ्यांनी याचा एकदा विचार केला पाहिजे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या कुठल्याच पक्षाकडे आज संपूर्ण जिल्ह्याला एकत्र करणारे असे सर्वसमावेशक नेतृत्व नाही, हे वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com