'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरातील शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरातील शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व
'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरातील शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व

'विठ्ठल' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी मेळाव्याला आले महत्त्व

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Vitthal Sugar Factory) संस्थापक माजी आमदार (कै.) औदुंबर पाटील (Audumbar Patil) यांच्या 98 व्या जयंतीचे निमित्त साधून विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील (Yuvraj Patil) यांनी मंगळवारी (ता. 23) दुपारी पंढरपुरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवराज पाटील यांच्या या शेतकरी मेळाव्याला महत्त्व आले असून, पाटील गटाने शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

मंगळवारी (ता. 23) (कै.) औदुंबर पाटील यांची 98 वी जयंती आहे. जयंतीच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाला जोडून श्री विठ्ठल हॉस्पिटलच्या आवारात दुपारी शेतकरी मेळाव्याचेही आयोजन केले आहे. विठ्ठल साखर कारखान्याच्या राजकारणातील अंतर्गत हालचालींच्या व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवराज पाटील यांनी विठ्ठल परिवारातील सभासद व शेतकऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली असून, तालुक्‍यातील विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांना व कारखान्याच्या सभासदांना मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्यात युवराज पाटील विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात कोणती भूमिका जाहीर करतात, याकडेच विठ्ठल परिवाराचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: नामशेष झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल!

शेतकरी मेळाव्याला परिवारातील ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, सहकार शिरोमणी कारखान्याचे माजी संचालक दामोदर पवार, 'विठ्ठल'चे माजी संचालक प्रकाश पाटील, मोहन उपासे, रावसाहेब चव्हाण, माजी सभापती राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब निकम, विलास साळुंखे, श्रीमंत देशमुख, एकनाथ महाराज हांडे आदी उपस्थित राहणार आहेत. या शेतकरी मेळाव्याला तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवराज पाटील यांनी केले आहे.

loading image
go to top