

Irrigation Crisis Deepens in Ujani Region, Farmers Express Strong Anger
esakal
-दावल इनामदार
ब्रह्मपुरी(सोलापूर): मंगळवेढा तालुक्यातील नळी, माचनूर,अरळी भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने शेती, पाणीपुरवठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे उजनी धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असतानाही तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हजारो एकरांवरील उभी पिके करपण्याच्या मार्गावर असून, हा प्रश्न आता केवळ कृषीपुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पातळीवरही धगधगू लागला आहे. एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने वाढलेल्या उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच शेतकऱ्यांना शेतीला दिल्या जाणारे पाण्याचे संकट आले आहे.