
सोलापूर : कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील आठवर्षीय श्रावणी कोटे हिचा गळा दाबल्याने श्रावणी हिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मंद्रूप पोलिसांनी मुलीच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे. मुलीने आजीसोबत बापाला नको त्या अवस्थेत पाहिल्याने बापाने गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप श्रावणीच्या आईने केला आहे.