

Horror in Karmala: Twin Brother and Sister Die After Being Thrown into Well
sakal
करमाळा : केत्तूर नं. २ (ता. करमाळा) येथे एका पित्यानेच आपल्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. शिवांश सुहास जाधव व श्रेया सुहास जाधव (वय ८) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. १०) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वडिलाला पोलिसांनी पकडताच विष प्राशन केल्याचे सांगितले.