वडिलानेच दिली मुलाच्या खूनाची सुपारी 

crime
crime
Updated on

सोलापूर : कामधंदा न करता जमीन नावावर करा म्हणून त्रास देणाऱ्या मुलाचा काटा त्याच्या वडीलांनीच काढला, अशी घटना मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली आहे. या प्रकरणात वळसंग पोलिसांनी मयताच्या वडीलासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. 


कुंभारी शिवारातील सोलापूर ते अक्कलकोट रस्त्यावरील जमादार वस्तीसमोर एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह पोलिसांना सापडला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद झाली. पोलिसांना सोशल मिडियाच्या माध्यमातून मयताचा ठावठिकाणा लागला. शैलेश सुरेश घोडके (वय- 28) हा मार्डी येथील असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, दोरीने आवळून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदनात समोर आले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी वडिलांनीच मुलाचा खून केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष मानगावे, पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील, पोलिस हवालदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, राजेश गायकवाड, मनोहर माने, सुभाष शेंडगे, आसिफ शेख, केशव पवार, शहानाज शेख, विकी माने आदींनी ही कामगिरी केली. 


तिघांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी 
शैलेश घोडके खून प्रकरणात संजय उर्फ भोजु राठोड (रा. मुळेगाव गल्ली, आशानगर, सोलापूर), शंकर नारायण वडजे (रा. सेवालालनगर, मुळेगाव तांडा), सुरेश सिध्दलिंग घोडके (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांना अक्कलकोट न्यायालयाने 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Women in Borale village staged a rally demanding an immediate ban on illegal liquor sales in Mangalwedha taluka.
Strong opposition has erupted against the proposal to attach Mohol taluka to the Pandharpur Additional Collector Office.
solapur city police comissioner m raj kumar
Solapur Municipal Corporation
Marathi News Esakal
www.esakal.com