

Tragic End for Twin Siblings as Father Commits Heinous Act
Sakal
करमाळा : केत्तूर नं. २ (ता. करमाळा) येथे वडिलांनी स्वतःच्या दोन जुळ्या मुलांचा विहिरीत ढकलून खून केला आहे. या दोन्हीही मुलांवर केत्तूर (ता. करमाळा) येथे रविवार (ता. ११) रोजी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शिवांश सुहास जाधव, श्रेया सुहास जाधव (वय ८) या मृत्यू झालेल्या जुळ्या बहीण भावाचे अंत्यसंस्कार आजोबांनी केले.