"या' तालुक्‍यातील आडसाली ऊस लागवड अंतिम टप्प्यात; मात्र "या'विषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था 

Adsali
Adsali
Updated on: 

केत्तूर (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याच्या उजनी लाभक्षेत्र परिसरातील बागायती भागातील आडसाली ऊस लागवड सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. तालुक्‍याचा पश्‍चिम भाग तसेच उजनी जलाशयाच्या तालुक्‍याचा परिसर ऊस पिकाचे आगार असून, या ठिकाणी उसाच्या पिकाला प्राधान्य दिले जाते. येथे सध्या आडसाली ऊस लागवडी अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते. 

या परिसरात उजनी जलाशयाच्या पाण्यावरच बागायती शेती अवलंबून आहे. येथे मुख्यतः ऊस पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. काही शेतकरी केळी तसेच इतर फळबागांकडे वळत आहेत, तरीही येथे नगदी पीक म्हणून उसालाच प्रथम पसंती दिली जाते. या वर्षी जूनच्या सुरवातीपासूनच वरचेवर पाऊस होत असल्याने काही ठिकाणी आडसाली ऊस लागवडी रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी नांगरट करून सरी पाडून ऊस लागवडीसाठी क्षेत्र तयार केले आहे; परंतु वरचेवर पडणाऱ्या पावसाने या लागवडीला मात्र ब्रेक लागला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये 100 टक्के क्षमतेने भरलेले उजनी धरण या वर्षी मात्र सध्या 18 टक्‍क्‍यांवरच आले आहे. त्यामुळे आगामी काळात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरेल का? तसेच पाणी पुरेल का? याविषयी शेतकरी मात्र सध्यातरी साशंकच आहेत. 

करमाळा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र वरचेवर वाढत असतानाच तालुक्‍यातील सहकारी साखर कारखाने मात्र या ना त्या कारणाने आजारी पडले आहेत. त्यातच कोरोना संकटामुळे ऊसतोड मजूर येतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तालुक्‍यातील उसासाठी आगामी काळ कसा असेल, हे आताच सांगणे मात्र अवघड झाले आहे. तसेच उसाच्या भावाचेही भिजत घोंगडे कायमच आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com