सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Final ward structure of Solapur Zilla Parishad and Panchayat Samiti announced Narkhed Kamati Budruk and Pokharapur Alteration in ward structure solapur

सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल

मोहोळ : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना आज सोमवार ता 27 रोजी जाहीर झाली असून, मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नरखेड, कामती बुद्रुक, व पोखरापूर या तीन गटात फेरबदल झाले आहेत. या पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना दोन जून रोजी जाहीर झाली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संदर्भात मोहोळ तालुक्यातील एकूण अकरा हरकती दाखल झाल्या होत्या. ही सुनावणी विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात आली. सुनावणी वेळी आठ हरकतदार उपस्थित होते तर तिघेजण अनुपस्थित होते. घेतलेल्या हरकती मध्ये प्रारुप प्रभाग रचना ही चुकीची व नियमबाह्य झाली असून त्यात दुरुस्त्या कराव्यात या सह अन्य हरकतींचा समावेश होता.एक हरकत मान्य करण्यात आली.

नवीन केलेल्या दुरुस्ती नुसार नरखेड जिल्हा परिषद गटातील पासलेवाडी व गलंदवाडी ही दोन गावे वगळून ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात सामाविष्ट केली आहेत. कोळेगाव हे गाव नरखेड गटातून वगळून ते कामती बुद्रुक जिल्हा परिषद गटात म्हणजे सावळेश्वर गणात समाविष्ट केले आहे. शिरापुर (सो) हे गाव कामती बुद्रुक जिल्हा परिषद गटातून म्हणजे सावळेश्वर गणातून वगळून ते नरखेड जिल्हा परिषद गटात समाविष्ट केले आहे. शिरापूर (सो) गावची लोकसंख्या ज्यादा असल्याने पूर्वीचा मसले चौधरी हा गण रद्द करून त्याऐवजी शिरापुर सो या पंचायत समितीच्या नवीन गणाची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: Final Ward Structure Of Solapur Zilla Parishad And Panchayat Samiti Announced Narkhed Kamati Budruk And Pokharapur Alteration In Ward Structure Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..