

View of the damaged grape orchard in Korfale where herbicide spraying caused heavy loss.
Sakal
बार्शी : कोरफळे (ता. बार्शी) येथे एक एकर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारल्याने बागेची पाने गळू व सुकू लागली. याबाबत कृषी विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार सुमारे ११ लाख रुपयांचे द्राक्षबागेचे नुकसान केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. किरण लिंबा बरडे (वय ५५, रा. कोरफळे, ता. बार्शी) यांनी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल केली. ही घटना २० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती.