

Gunny Bag Warehouse Fire Shocks Solapur Market Yard
sakal
उ.सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील बारदान्याच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दोन दुकाने व दुकानातील अडीच कोटी रुपयांचा बारदाना व इतर फर्निचर जळून खाक झाले. शनिवारी पहाटे तीन ते चार दरम्यान ही आग लागली. या आगीमुळे परिसरात पहाटे पासून धुराचे लोळ दिसून येत होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे.