
नातेपुते : प्रयत्न केल्यानंतर सर्व शक्य आहे, असे म्हणतात त्याप्रमाणे सात ते आठ वर्ष पूर्ण घरादाराचा त्याग करून शंभर टक्के समर्पण वृत्तीने अभ्यास करून पिरळे (ता. माळशिरस)येथील गणेश चंद्रकांत नरळे याची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. गावकऱ्यांनी कौतुकाने त्याची उघड्या जीपमधून व घोड्यावरून फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल व हलगी लावून गावातून मिरवणूक काढली. गणेश हा पिरळे गावातील पहिलाच पीएसआय म्हणून त्याने बहुमान मिळवला.