esakal | अकरावी विज्ञानाचा कट ऑफ 93.80 टक्के! वाणिज्य, कला शाखेसाठी कट ऑफ आहे "इतका' 
sakal

बोलून बातमी शोधा

Mission Admission

प्रत्येक महाविद्यालयाने प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन स्वीकारले होते. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा असलेला ओढा यातून अधोरेखित झाला आहे. यंदाच्या वर्षी दहावीचा निकालही खूप लागला होता. अनेक विद्यार्थ्यांनी 99 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविले होते. त्या वेळीच अकरावीला विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे जवळपास निश्‍चित झाले होते.

अकरावी विज्ञानाचा कट ऑफ 93.80 टक्के! वाणिज्य, कला शाखेसाठी कट ऑफ आहे "इतका' 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर : अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी महाविद्यालयांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये ही यादी खुल्या प्रवर्गातील विज्ञान शाखेसाठी ए. डी. जोशी महाविद्यालय व भारती विद्यापीठात 93.80 टक्‍क्‍यांवर कट ऑफ झाली आहे. त्याखालोखाल वालचंद महाविद्यालयात 92.80, दयानंद महाविद्यालयात 92.60 तर संगमेश्‍वर महाविद्यालयाचा विज्ञानाचा कट ऑफ 92 टक्के इतका आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे अजूनही गणेश मूर्तींची विक्री संथगतीने; "या' मूर्तींना मिळतेय भाविकांची पसंती 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. प्रत्येक महाविद्यालयाने अर्ज ऑनलाइन स्वीकारले होते. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा असलेला ओढा यातून अधोरेखित झाला आहे. यंदाच्या वर्षी दहावीचा निकालही खूप लागला होता. अनेक विद्यार्थ्यांनी 99 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविले होते. त्या वेळीच अकरावीला विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे जवळपास निश्‍चित झाले होते. त्यानुसार पहिल्या गुणवत्ता यादीच्या माध्यमातून ते स्पष्ट झाले आहे. 

गुड न्यूज : गुड न्यूज : बंगळूरच्या श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात यावर्षी सोलापूरची गणेश मूर्ती होणार स्थापन  

विज्ञानाच्या खालोखाल वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. वाणिज्य शाखेची पहिल्या गुणवत्ता यादीत भारती विद्यापीठाचा कट ऑफ 89.20 टक्के इतका आहे. त्याखालोखाल हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचा कट ऑफ 87.80 टक्के इतका आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कला शाखेसाठी असलेल्या जागा रिक्त राहणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. भारती विद्यापीठात कला शाखेसाठी 81.20 टक्के कट ऑफ झाला आहे. याशिवाय दयानंद महाविद्यालयात 70 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळणार आहे. 

शहरातील प्रमुख महाविद्यालयांची स्थिती (विज्ञान शाखा) 
महाविद्यालयाचे नाव :   ओपन     एससी     एसटी     ओबीसी   एसबीसी    एसइबीसी 
ए. डी. जोशी :            93.80     86.60    84.60    87.40      92.20      88.40 
वालचंद :                   92.80        -             -           -              -              - 
दयानंद :                   92.60     84.80     63.40    88.20     91.80      86.80 
संगमेश्‍वर :                92             87       63.40      87          90           87 

शहरातील प्रमुख महाविद्यालयांची स्थिती (वाणिज्य शाखा) 
महाविद्यालयाचे नाव :  ओपन     एससी      एसटी     ओबीसी   एसबीसी    एसईबीसी 
भारती विद्यापीठ :       89.20    86.20         -         82.60       -             83.40 
हिराचंद नेमचंद :        87.40        -             -             -           -                - 
संगमेश्‍वर :                  80         72        50.20     71.20     76.20       62.60 
डी.ए.व्ही. वेलणकर :     85         54          54          75          84            52 

बुधवारपर्यंत घेता येणार प्रवेश 
पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक लागला आहे, त्यांनी बुधवारपर्यंत (ता. 26) प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर 31 ऑगस्टला दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, सहायक शिक्षण निरीक्षक मिलिंद मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top