डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण ः प्रांताधिकारी दीपक शिंदे

corona vaccine.jpg
corona vaccine.jpg

दक्षिण सोलापूर (सोलापूर) ः दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कोविड लसीकरणाचा आढावा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी झालेल्या पूर्व तयारीच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी पहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील शासकिय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासह अन्य विषयांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

कोविड लसीकरणाबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवाकडून आलेल्या सूचनेनुसार पूर्वतयारीची तालुकास्तरीय बैठक झाली. प्रांताधिकारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत श्री. शिंदे यांनी तालुक्‍याचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी रंजना कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, व्ही. बी. म्हेत्रे, रोटरी क्‍लबचे एस. पी. अग्रवाल, पी. जी. कारकल उपस्थित होते. 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यात मार्चपासून आतापर्यंत 1 हजार 555 रूग्ण कोविडबाधित आहेत. आतापर्यंत 54 रुग्णांचा मृत्यू झाला असून, उर्वरित रुग्ण बरे झाल्याने घरी पाठवण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. सध्या तालुक्‍यात कोविडबाधित असलेल्या 21 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्‍यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय, एक आयुर्वेदिक दवाखाना तसेच एक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, तीन खासगी रुग्णालय व 76 खासगी वैद्यकिय व्यवयायिक यांच्यामार्फत आरोग्यसेवा सुरू आहे. याठिकाणी काम करणारे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, नर्स व सुपरवायझर, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ यांना पहिल्या टप्यात लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतची सविस्तर आकडेवारी त्वरीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आली. 

आराखडा तयार करण्याच्या सूचना 
तालुक्‍यातील सर्व डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी व मेडिकल स्टुडंट यांची माहिती को विन सॉफ्टवेअरमध्ये भरणे, कोविड लस उपलब्ध होण्यापूर्वी तालुक्‍यात किती लाभार्थ्यांना पहिल्या टप्यात लस द्यावयाची आहे, या बाबतचे सुक्ष्म कृती आराखडे तयार करणे, कोविड लस साठविण्यासाठी व त्याचे वितरण करण्यासाठी आवश्‍यक असणारे आयएलआर व डिफ्रिजर, कोल्ड बॉक्‍स, व्हॅक्‍सिन कॅरिअरची गरज लक्षात घेउन जिल्हास्तरावर अतिरिक्त साहित्याची मागणी नोंदवणे, यावर नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी शिंदे यांनी दिल्या.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com