21 लाखांचे आमिष दाखवून केली 11 लाखांची फसवणूक

In Mohol taluka, 11 lakhs have been swindled by showing a lure of 21 lakhs
In Mohol taluka, 11 lakhs have been swindled by showing a lure of 21 lakhs
Updated on

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील पोफळी येथील पंडित नाना कोळी यांना (ता.4 मार्च 2019) रोजी अज्ञात इसमाने फोन करून तुम्हाला 21 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगून तुम्हाला जर बक्षीस नको असेल तर इनोव्हा गाडी मिळेल. सुरवातीला 12 हजार 500 रुपये भरा,असे सांगून वारंवार वेगवेगळ्या खात्यावर अकरा लाख तीन हजार रुपये भरून घेऊन ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नाना कोळी रा. पांडवाची पोफळी ता. मोहोळ यांना (ता.4 मार्च 2019) रोजी 7387666220 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने कोळी यांना सांगितले की, तुमच्या नंबरवर 21 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे. तुम्हाला जर बक्षीस नको असेल तर इनोव्हा गाडी लागली आहे.

जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर सुरवातीला केवळ 12 हजार 500 रु भरा. त्यावेळी कोळी यांनी आम्हाला गाडी नको 21 लाख रुपये माझ्या खात्यावर पाठवा असे सांगितले. त्यावेळी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सदरचे 21 लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यावर पाठवू त्यापूर्वी तुम्ही आमच्या सरकारचा दोन टक्के टॅक्‍स भरा, अज्ञात व्यक्तीने दिलेल्या 38663348464 या बॅंक खाते क्रमांकावर त्यांनी फोन पे व गुगल पे वरून 21 हजार रुपये पाठवले.

त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तुमचा 21 लाख रुपयांचा चेक तयार केला आहे. मात्र, बॅंक मॅनेजर चार टक्के दिल्याशिवाय सही करणार नाही, असे सांगून कोळी यांच्याकडून आणखी 86 हजार फोन पे व गुगल पे करून घेतले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या कारणावरून कोळी हे पैसे भरत गेले. कोळी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सोलापूर येथे जाऊन सायबर सेल येथे तक्रारी अर्ज दिला.

दरम्यान 4 मार्च 2019 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत अज्ञात व्यक्तीने कोळी यांच्याकडून तब्बल 11 लाख 3 हजार रुपये इतकी रक्कम गुगल पे व फोन पे वरून तीन वेगवेगळ्या बॅंक खात्यावर मागवून घेत पंडित नाना कोळी यांना टोपी घातली. याप्रकरणी कोळी यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Flood Relief Stalled in Solapur 13000 Eligible Farmers Still Waiting for 46 Crore Compensation After Heavy Rains
Pune Satara Solapur Get Relief as Bhatghar Dam Becomes Full Water Discharge Starts Into Nira River
Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Marathi News Esakal
www.esakal.com