कोरोना : 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नीलकंठेश्‍वर रथोत्सव रद्द; समाज पदाधिकाऱ्यांचा निर्णय 

Neelkantheshwar Rathotsav
Neelkantheshwar Rathotsav
Updated on

सोलापूर : कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच श्री नीलकंठेश्वर रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखर पेठ येथील नीलकंठेश्वर मंदिरात यंदाच्या श्रावण मासात कोणतेही धार्मिक पूजाविधी किंवा कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बालाजी मुटकिरी यांनी दिली. 

कुरहिनशेट्टी समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत श्रावण मासातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपाध्यक्ष बालाजी येज्जा, सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, संचालक राजेश कामूर्ती, राजेंद्र द्यावरकोंडा, श्रीनिवास बिचल, दीनानाथ धुळम, सुदर्शन माडगुंडी, रामचंद्र मुटकिरी, डी. एस. आडकी आदी उपस्थित होते. 

कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या वतीने दरवर्षी श्रावण मासात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. संपूर्ण महिनाभर पहाटे मंदिरात पारायण कार्यक्रम चालतो. यंदा पारायण सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे. समाजाच्या वतीने श्रावण मासात नियोजित असलेले विविध मानकरी पूजांचे लिलाव देखील रद्द करण्यात आले आहेत. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी समाजाच्या वतीने श्री नीलकंठेश्वर रथोत्सव काढण्यात येतो. हा रथोत्सव साखर पेठ येथील मंदिरापासून जोडभावी पेठ, घोंगडे वस्ती, चाटला चौक, भुसार गल्ली, समाचार चौक, भारतीय चौक, तेलंगी पाच्छा पेठ, राजेंद्र चौक, साखर पेठ येथून मंदिरापर्यंत काढला जातो. यंदा हा रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून, मंदिरात होणारा शिवपार्वती कल्याणोत्सव व आठ ते हजार जणांना महाप्रसाद वाटप कार्यक्रम रहीत करण्यात आला आहे. तसेच या वर्षाची सर्वसाधारण सभा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. समाजबांधवांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. मुटकिरी म्हणाले, सोलापुरात वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत श्री नीलकंठेश्‍वर रथोत्सव व इतर धार्मिक विधी रद्द करण्यात आले आहेत. श्रावण मासातील दैनंदिन नित्यपूजा मंदिराच्या पुजाऱ्यांकडून सुरू राहील; पण पूजेला कोणालाही उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे भक्तांनी नीलकंठेश्वर मंदिराकडे दर्शनाकरिता येऊ नये, तसेच श्रावण मासात कोणतेही नैवेद्य मंदिरात आणू नये, अशी सूचना देखील समाजाकडून जाहीर करण्यात आली आहे. समाजबांधवांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com