

Sand Mafia Violence: Five Arrested After Black Oil Attack
Sakal
टेंभुर्णी : अकोलेखुर्द येथील ॲड. पांडुरंग तोडकर यांना वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करा, या मागणीसाठी अकोलेखुर्द व फुटजवळगांव येथील ग्रामस्थांनी काढलेल्या टेंभुर्णी येथील मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एकेरी उल्लेख केल्याच्या कारणावरून जिल्हा लेबर फेडरेशन माजी चेअरमन भारत पाटील यांच्या अंगावर काळे तेल ओतून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावरील बायपास पुलानजीक एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे.