Solapur Accident
sakal
मोहोळ : पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटी येथे शनिवार दिनांक 17 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाला आहे. पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार (MH-46 Z 4536) या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला.