esakal | आगीमुळे पाच दुकाने भस्मसात ! पंधरा दिवसातील जळीताची दुसरी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Five shops have been gutted in the fire at Mohol

दरम्यान आगीची कल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील यांना मिळताच तातडीने लोकनेते साखर कारखान्याची अग्नीशामक गाडी पाठवून देण्यात आली.

आगीमुळे पाच दुकाने भस्मसात ! पंधरा दिवसातील जळीताची दुसरी घटना

sakal_logo
By
चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : शहरातील कुरुल रोड येथील जुबेर कुतुबुद्दीन शेख (बॉम्बेवाले यांच्या पत्र्याच्या शॉपिंग सेंटरला पहाटे ३.३० च्या सुमारास आग लागून लाखो रूपयांच्या नुकसानीसह पाच दुकाने आगीत भस्मसात होऊन जळून खाक झाली. 

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द ! ऑनलाइन शिक्षणाचे बंधन; कामचुकारांवर बिनपगारीची कारवाई

मोहोळ - कुरूल रोडवरील घराच्या समोरच रस्त्याच्या कडेला जुबेर कुतुबुद्दीन शेख (बॉम्बेवाले)  यांनी पत्र्याचे पाच दुकाने उभारली होती. रविवार पहाटे ३ .४५ च्या सुमारास त्यांना मोठा आवाज ऐकू आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन पाहीले असता समोरील दुकानांना आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ आपल्या मुलांना झोपेतून उठवून जहीर खैरेदी या नातलगांना फोन केला व घरातील बोअर सुरु करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीची कल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष अंजिक्यराणा पाटील यांना मिळताच तातडीने लोकनेते साखर कारखान्याची अग्नीशामक गाडी पाठवून देण्यात आली.

माहेरून तीन लाख रुपये आण, मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे म्हणून विवाहितेचा छळ

दरम्यान लोकमंगल साखर कारखान्याची ही अग्नीशामक गाडी घटनास्थळी आली होती. दोन्ही गाड्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीच्या दुर्घटनेमध्ये जागेचे मालक जुबेर शेख यांच्या मालकीचे बॉम्बे इलेक्ट्रॉनिक्स या दुकानासह नरfगडे क्लिनिकल लॅबोटरी प्रो. रोहिणी संतोष नरगिडे, श्री सिध्द नागेश किराणा व जनरल स्टोअर्स प्रो. सुनिल हरिभाऊ कार्यकर्ते, श्री बालाजी गॅस fरपेंfरंग प्रो. संतोष राठोड, विशाल अॅटो गॅरेज प्रो.विशाल पवार आदी दुकाने आगीत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पंधरा दिवसातील शहरातील आगीची ही दुसरी दुर्घटना असून नुकतीच आमदार यशवंत माने यांनी 'सकाळ' ला दिलेल्या माहितीनुसार 'नगर परिषदेला अग्नीशामक गाडी मंजुर' (दै .सकाळ मधील (ता .१०) एप्रिलची बातमी) झाली असून लवकरात लवकर सदर अग्नीशामक वाहन नगर परिषदेला मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. आगीचे कारण समजले नसून लॉकडाऊननंतर आत्ता कुठे छोटे-मोठे व्यावसायिक स्थीर होत असतानाच या दुर्घटनेमुळे संबधित दुर्घटनाग्रस्त दुकानदारासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

दुकाने जळीतांच्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जिथे जिथे ( मेनरोड सह ) पत्र्याची दुकाने आहेत. अशांना व खाजगी जागाधारकांनाही पक्क्या विटाच्या बांधकामाची दुकाने बांधण्याची त्वरीत परवानगी द्यावी अथवा सक्ती करावी.  
- दत्तात्रय पुराणिक (महाराज), अध्यक्ष-नागनाथ टपरी धारक संघटना, मोहोळ