
पाचोड (जि. छत्रपती संभाजीनगर): वेरूळसह विविध देवस्थानांचे दर्शन करून परतणाऱ्या सोलापूरच्या पाच शिक्षकांची कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर या कारने पेटही घेतला. घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ कारमधील शिक्षकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ सोमवारी (ता. ४) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला.